‘कपकपी’मध्ये श्रेयस तळपदे
23 मे रोजी प्रदर्शित होणार हॉरर-कॉमेडीपट
बॉलिवूडची पसंतीची कॉमिक जोडी श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर एका रोमांचक हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘कपकपी’द्वारे पुन्हा एकत्र आले आहेत. श्रेयस आणि तुषारने या चित्रपटाचे पोस्टर सादर केले असून आता याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
दिवंगत संगीत सिवन यांच्याकडून दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या अखेरच्या प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. त्याच्या निधनानंतर या चित्रपटाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आहे. दिग्दर्शकाचे मे 2024 मध्ये निधन झाले होते. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. कपकपी हा चित्रपट 23 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू माधवन यांनी पेले आहे. 2023 मधील मल्याळी ब्लॉकबस्टर रोमांचम या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती जयेश पटेल आणि उमेश बंसल यांनी झी स्टुडिओज आणि ब्रावो एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत केली आहे.