For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशिया चषक स्पर्धेतून श्रेयांका बाहेर

06:41 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आशिया चषक स्पर्धेतून श्रेयांका बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/ डंबुला

Advertisement

सध्या लंकेत सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतून भारतीय संघातील गोलंदाज श्रेयांका पाटीलला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत आहे. या स्पर्धेतील सलामीच्या पाक विरुद्धच्या सामन्यात झेल टिपण्याचा प्रयत्न करताना श्रेयांकाला ही दुखापत झाली आहे.

भारत आणि पाक यांच्यात या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या सामन्यात श्रेयांका पाटीलने किफायतशीर गोलंदाजी करत 3.2 षटकात 14 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. भारतीय विजयामध्ये तिचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पाक विरुद्धच्या सामन्यात झेल टिपत असताना तिच्या डाव्या हाताच्या चौथ्या बोटाचे हाड मोडल्याने तिला ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागत आहे. आता या स्पर्धेत उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात श्रेयांका पाटीलच्या जागी 26 वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाज तनुजा कवंरचा समावेश करण्यात आला आहे. श्रेयांका पाटीलने आतापर्यंत 12 टी-20 आणि 3 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून 2023 च्या डिसेंबर महिन्यात तिने क्रिकेट क्षेत्रात पुनरागमन केले होते. बांगलादेशमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तंदुरुस्ती राखण्याकरीता श्रेयांकाचे प्रयत्न राहतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.