श्रावणी तरळे ‘बेळगाव केसरी’
10:29 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
हिंडलगा : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने बेळगाव येथे आयोजित कुस्ती मैदानात आंबेवाडी येथील महिला कुस्ती खेळाडू श्रावणी प्रदीप तरळेने महिलांच्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून बेळगाव केसरी बहुमानास चांदीची गदा पटकाविली. या यशामुळे आंबेवाडी येथील श्रीराम युवक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. डॉ. प्रभाकर तरळे, डॉ. सचिन तरळे, राहुल भातकांडे, प्रमोद तरळे, विनय कदम, तानाजी भातखांडे, प्रेम तरळे यांच्यावतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या गावात प्रथमच महिला कुस्ती स्पर्धेत असे मोठे यश मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Advertisement
Advertisement