For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियकराच्या चित्रपटात काम करणार श्रद्धा

06:52 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रियकराच्या चित्रपटात काम करणार श्रद्धा
Advertisement

हुतात्मा पोलीस अधिकाऱ्यावर येणार चित्रपट

Advertisement

श्रद्धा कपूर आगामी काळात प्रियकर राहुल मोदीच्या एका चित्रपटात काम करणार आहे. राहुल मोदी हा एक लेखक आणि फिल्ममेकर आहे. ‘ईथा’ चित्रपटानंतर ती राहुल मोदीच्या एका चित्रपटात दिसून येणार असून याची कहाणी स्टार्टअपच्या जगतावर आधारित असणार आहे. चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत आव्हानात्मक असेल असे श्रद्धाचे सांगणे आहे. निर्माती म्हणून सुपर फॅट स्टुडिओसोबत दोन चित्रपटांची सहनिर्मिती करणार आहे. यातील एक चित्रपट शूर पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्यावर आधारित असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अखिव अली करणार आहेत अशी माहिती तिने दिली आहे.

श्रद्धाने आणखी एका चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले असून याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तर राहुल मोदीचा चित्रपट स्टार्टअपच्या जगतावर आधारित असणार आहे. उद्योगजगतातील घडामोडी आणि त्याच्या ऊर्जेवर ही कहाणी बेतलेली असेल, असे श्रद्धाने सांगितले आहे.

Advertisement

कारकीर्दीच्या या टप्प्यात मी केवळ कलाकार म्हणून विकास घडवून आणणाऱ्या भूमिकांची निवड करत आहे. कलाकार म्हणून आव्हानात्मक वाटणाऱ्या भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. याचमुळे मी अत्यंत विचारपूर्वक पटकथांचे वाचन करत असल्याचे तिने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.