For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द गेम : यू नेवर प्ले अलोन’मध्ये श्रद्धा श्रीनाथ

06:50 AM Sep 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘द गेम   यू नेवर प्ले अलोन’मध्ये श्रद्धा श्रीनाथ
Advertisement

नेटफ्लिक्सची नवी वेबसीरिज

Advertisement

अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथची नवी तमिळ थ्रिलर सीरिज ‘द गेम : यू नेवर प्ले अलोन’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये संतोष प्रताप, चंदिनी, श्यामा हरिनी, बाला हसन, सुभाष सेल्वम, विविया संत, धीरज आणि हेमा हे कलाकार दिसून येणार आहेत. ही सीरिज हिंदी, कन्नड, मल्याळीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्रद्धाने या सीरिजचे एक पोस्टर शेअर केले आहे. ही सीरिज 2 ऑक्टोबरपासून पाहता येणार आहे. दिग्दर्शक  राजेश एम. सेल्वा यांनी ही सीरिज केवळ थ्रिलर धाटणीची नसून सध्याच्या जगाला दर्शवणारी आहे, जेथे आयुष्य रहस्य, फसवणूक अणि बदलत्या नात्यांमध्ये गुंतलेले असल्याचे म्हटले आहे.  ही कहाणी लोकांचे पर्याय, दुर्बलता आणि सत्य-विश्वासघातादरम्यानची अंधूक रेषा दर्शविणारी आहे.

Advertisement

श्रद्धा श्रीनाथ ही यापूर्वी कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. श्रद्धाला 2016 मध्ये ‘यू टर्न’ चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटासाठी श्रद्धाला फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. याचबरोबर श्रद्धा ही अभिनेता नानीसोबत जर्सी या चित्रपटात दिसून आली आहे.

Advertisement
Tags :

.