Sangli : जत तहसिल प्रशासनाचे श्राद्ध आंदोलन
ओढापात्र अतिक्रमण प्रकरणी जत तहसील प्रशासनाविरोधात तीव्र निषेध
जत:उमराणी (ता.जत) गावातील नैसर्गिक ओढापात्रात अवैध मार्गाने मुरूम टाकून उभारलेली खोकी काढून ओढापात्र खुले करावे. यासाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे निषेधार्थ राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी जत तहसिल प्रशासनाचे श्राद्ध घालून निषेध आंदोलन केले. यावेळी तालुकाध्यक्ष नवनाथ पवार, सिध्दाप्पा खांडेकर उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी नष्टे यांना दिलेल्या निवेदनात राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे की, उमराणी पाझर तलावालगत असण्प्रया नैसर्गिक ओढापात्रात उत्खनन केलेला व लाखों पयांची रॉयल्टी बुडवून मुरूम टाकला आहे. विनापरवाना सपाटीकरण करून ग्रामपंचायतीने दुकाने गाळे उभा करीत ओढापात्रावर अतिक्रमण केले आहे. नैसर्गिक ओढापात्र मुजविण्यासाठी संबधित विभागाची परवानगी घेतलेली नाही.
मुरुमाची. ई.टी.एस. मोजनीमध्ये ३९२.२३५ ब्रास मुरूम टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी उमराणी ग्रामपंचायतीकडून केवळ ६० ब्रासची रॉयल्टी भरून जुजबी कारवाई फार्स केला आहे. तेंव्हा ३३२.२३५ ब्रास मुरूमाची बुडालेली रॉयल्टी दंडासह भरुन घ्यावी. कर्तव्यात कसूर करणारे तलाठी प्रवीण घाडगे, मंडळ अधिकारी उत्तम कांबळे यांची चौकशी करावी.
तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर महसुल नियमांचे उल्लंघनकरणे, पदाचा गैरवापर करणे, दप्तर दिरंगाई करणे, महसुल बुडविणे, तक्रारधारकाना धमकावणे, प्रकरणी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी प्रांताधिकारी नष्टे यांचेकडे केली होती. परन्तु दुर्लक्ष केले. म्हणून महसुल प्रशासनाचा श्राद्ध आंदोलन केले. यावेळीं राज्याध्यक्ष प्रशांत केदार, जिल्हाध्यक्ष बंडू केंगार, तालुकाध्यक्ष नवनाथ पवार, सिध्दाप्पा खांडेकर, निलेश मांगलेकर, अविनाश पाथरवट, रविराज भूकटे, बसगोंडा तेली, शहाजी वाघमोडे, अतुल ऐवळे, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.