श्रद्धा कपूरचा ‘ईथा’ 28 ऑगस्टला झळकणार
श्रद्धा कपूरला यापूर्वी ‘स्त्राr 2 : सरकटे का आतंक“ या चित्रपटात पाहिले गेले होते. श्रद्धाचा आगामी चित्रपट ‘ईथा“ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी आता हा चित्रपट चालू वर्षीच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटात श्रद्धा दमदार आणि महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात श्रद्धासोबत रणदीप हु•ा आणि मोहम्मद जीशान अय्यूब देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. रणदीप यात मुख्य नायक अन् रोमँटिक भूमिकेत असेल. तर श्रद्धा ही प्रसिद्ध कलाकार विठाबाई यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘ईथा“ हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा अन् लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. याची कहाणी 1940 पासून 1990 च्या दशकापर्यंत फैलावलेली असेल, ज्यात त्या प्रसिद्ध होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखविण्यात येणार आहे.
विठाबाई यांनी कमी वयातच स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. विठाबाईंना मंचावरील स्वत:ची जबरदस्त उपस्थिती, भावपूर्ण आवाज आणि उत्साहाने भरलेल्या नृत्यासाठी ओळखले जायचे. भारतीय लोकसंस्कृतीत योगदानासाठी विठाबाई यांना 1957 आणि 1990 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते.