‘नागिन’ चित्रपटात श्रद्धा कपूर
लवकरच सुरू होणार चित्रिकरण
अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘नागिन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण आता लवकरच सुरू होणार आहे. निर्माते निखिल द्विवेदी यांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले असून यात चित्रपटाच्या पटकथेची झलक दिसून येत आहे. तसेच यात नागिन अॅन एपिक टेल ऑफ लव्ह अँड सॅक्रिफाइज असे लिहिले गेले आहे. तर त्याच्याखाली क्रिएटेड अँड डेव्हलप्ड बाय सॅफरॉन मॅजिक वर्क्स असेही नमूद आहे. पटकथेच्या चहुबाजूला फुलंही दिसून येतात.
श्रद्धा कपूर या चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील होण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याची माहिती निखिल द्विवेदीने दिली आहे. श्रद्धा कपूर यापूर्वी स्त्राr 2 या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तर या चित्रपटाने 597 कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. हा चित्रपट मागील वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता.