श्रद्धा कपूरला मिळाला नवा चित्रपट
राही अनिल बर्वेंच्या चित्रपटात मुख्य भूमिका
श्रद्धा कपूर यापूर्वी स्त्राr 2 या चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर तिने स्वत:च्या आगामी चित्रपटाची कुठलीच अधिकृत घोषणा केली नाही. परंतु श्रद्धा लवकरच तुम्बाडचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्यासोबत एक नवा प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करणार आहे.
या चित्रपटाची कहाणी आणि नावाचा खुलासा सध्या झालेला नाही. श्रद्धा आणि एकता कपूर यांच्यात या चित्रपटासंबंधी बोलणी सुरू आहे. हा एक हाय-कॉन्स्पेट थ्रिलर चित्रपट असून याचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे करणार आहेत. चित्रपटाची कथा पूर्ण झाली असून श्रद्धाला ती पसंत पडली आहे.
याचबरोबर श्रद्धा कपूर ही एकता कपूरसोबत एका प्रेमकहाणीवर चर्चा करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहेत. यात श्रद्धासोबत पुन्हा एकदा आदित्य रॉय कपूर दिसून येऊ शकतो. श्रद्धाकडे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत, परंतु त्याचा तपशील सध्या गुप्त ठेवण्यात आला आहे.
याचदरम्यान श्रद्धा कपूर ‘नागिन ट्रिलॉजी’च्या तयारीत व्यग्र आहे. हा एक मेगाबजेट चित्रपट असून याचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत आहेत. यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात वीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे.