For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप

06:12 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
Advertisement

एक्स बॉयफ्रेंड राहुल मोदीला केले अनफॉलो

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘स्त्राr2’ वरून चर्चेत आहे. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर राजकुमार रावसोबत तिची जोडी पहायला मिळणार आहे. अशा स्थितीत दोन्ही कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याचदरम्यान श्रद्धा कपूरचा प्रियकर  राहुल मोदीसोबत ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत ब्रेकअप केला आहे. तसेच तिने राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. अभिनेत्रीने याचबरोबर राहुल मोदीची बहिण, त्याचे प्रॉडक्शन हाउस आणि पाळीव श्वानालाही अनफॉलो केले आहे. श्रद्धा कपूरने काही महिन्यांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती. श्रद्धा एका चित्रपटावरून राहुलसोबत काम करत असल्याचे बोलले जात होते. या चित्रपटाची निर्मिती राहुल मोदीच करणार होता. परंतु दोघांचाही ब्रेकअप झाल्याने या चित्रपटाचा प्रोजेक्ट रद्द झाल्यात जमा आहे. मार्च महिन्यात श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये सामील झाले होते. त्यावेळी दोघेही एकत्र दिसून आले होते. राहुल मोदी हा लेखक म्हणून लोकांना परिचित आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.