For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्राची बंगाल टायगर्सची सडन डेथमध्ये एसजी पायपर्सवर मात

06:52 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्राची बंगाल टायगर्सची सडन डेथमध्ये एसजी पायपर्सवर मात
Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

श्राची बंगाल टायगर्सने नियमित वेळेत गोलशून्य बरोबरीनंतर सडन डेथ शूटआऊटमध्ये एसजी पायपर्सवर मात करत येथे चालू असलेल्या महिला हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने येतील.

गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पायपर्सने लक्षणीय आघाडीमुळे या सामन्यापूर्वीच अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. त्यांच्या मागील सामन्यासारखीच या सामन्याची वाटचालही राहून सामना सडन डेथपर्यंत गेला आणि टायगर्सने विजय मिळवून एक महत्त्वाचा बोनस गुण मिळवत अंतिम सामन्यातील आपले स्थान निश्चित केले. पहिल्या सत्रात दोन्ही बाजूंनी जोरदार खेळ पाहायला मिळाला, कारण एसजी पायपर्स आणि श्राची बंगाल टायगर्स या दोन्ही संघांनी सुऊवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.

Advertisement

सुऊवातीची गती आणि दोन्ही बाजूंनी संधी मिळूनही कोणताही संघ गोल करू शकला नाही आणि पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले. दुसऱ्या सत्रात श्राची बंगाल टायगर्सने एसजी पायपर्सच्या बचावावर सुऊवातीपासूनच दबाव आणला आणि आक्रमणांची मालिका सुरू केली. पण पायपर्सची गोलरक्षक बंसरी सोळंकी उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. तिने अनेक शानदार बचाव करत टायगर्सला गोल करण्यापासून रोखले. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा राहून तिसऱ्या व चौथ्या सत्रातही ही परिस्थिती बदलली नाही. निर्धारित वेळेत सामना 0-0 असा गोलशून्य बरोबरीत राहिल्याने शूटआऊटमध्ये गेला.

शूटआऊटमध्ये श्राची बंगाल टायगर्सकडून केवळ पूर्णिमा यादव आणि नूर डी बात यांनीच गोल केले, तर एसजी पायपर्सने जुआना कॅस्टेलारो आणि केटलिन नॉब्स यांच्या यशस्वी प्रयत्नांनी उत्तर दिले. परिणामी 2-2 अशी बरोबरी झाली. या बरोबरीमुळे सामना सडन डेथमध्ये गेला, जिथे टायगर्सने आपला संयम राखत पाचही प्रयत्न यशस्वी केले, तर पायपर्स पाचपैकी चारच प्रयत्न यशस्वी करू शकले.

Advertisement
Tags :

.