For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : जिल्हा परिषदेच्या 13 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

03:23 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   जिल्हा परिषदेच्या 13 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
Advertisement

                      बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी १३ प्राथमिक शिक्षक निलंबित

Advertisement

कोल्हापूर : बदलीसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा परिषदेकडील १३ प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन.एस यांनी मंगळवारी निलंबित केले आहे. त्यानंतर त्या शिक्षकांना गुरुवारी सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले आहे.

सोयीच्या ठिकाणी बदल्या करुन घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी दिव्यांग आणि आजारपणाची बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यामुळे संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्र पडताळणीचे आदेशदिले होते. कोल्हापूर जि. प.कडील अशा बदल्यांचा लाभ घेतलेल्या ३५५ शिक्षकांना फेरतपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ५३ शिक्षकांच्या प्रमाणपत्र संशय व्यक्त करण्यात आला होता.

Advertisement

त्यापैकी २६ शिक्षकांनी बोगसप्रमाणपत्रे सादर केल्याचे समोर आले होते.नोव्हेंबर २०२५ मध्ये चार शिक्षकांनानिलंबित केले आहे. त्यानंतर आणखी १८ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले तर चौघांनी दिलेले खुलासे प्रशासनाने मान्य केले. अन्य१३ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन.एस यांनी त्यांचे निलंबन केले.

गुरुवारी त्या शिक्षकांना कारणेदाखवा नोटीस बजावून खुलासा करण्याचेआदेश दिले आहेत. खुलासा आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.