झोमॅटोला कारणे दाखवा नोटीस
400 कोटींपेक्षा अधिकची जीएसटीची नोटीस
वृत्तसंस्था /मुंबई
ऑनलाइन अन्न वितरण करणारी कंपनी झोमॅटो लिमिटेडला डिलिव्हरी शुल्काबाबत 401.7 कोटी रुपयांच्या जीएसटी दायित्वासाठी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये केलेल्या फाइलिंगमध्ये दावा केला आहे की डिलिव्हरी भागीदारांकडून डिलिव्हरी शुल्क आकारले जात असल्याने ती रक्कम देण्यास ती जबाबदार नाही असेही स्पष्ट केले आहे. झोमॅटोच्या माहितीनुसार, कंपनीला 26 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 च्या कलम 74(1) अंतर्गत जीएसटी इंटेलिजन्स महासंचालक (पुणे क्षेत्रीय युनिट) कडून कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. डिलिव्हरी भागीदारांच्या वतीने कंपनीकडून डिलिव्हरी चार्जेस वसूल केले जात असल्याने ते कोणताही कर भरण्यास जबाबदार आहे यावर विश्वास ठेवत नाही, झोमॅटो यांनी स्टॉक फाइलिंगमध्ये सांगितले. कारणे दाखवा नोटीसला योग्य ते उत्तर देण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.