Gokul Sabha 2025: लाडकी बहिण म्हणता तर मग माईक का काढून घेतला? Shoumika Mahadik यांचा सवाल
सभा शांततेत होईल अशी अपेक्षा होती मात्र यंदाचीही सभा काहीशी गोंधळातच झाली
By : धीरज बरगे
कोल्हापूर : गोकुळची मंगळवारी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा लाडक्या बहिण- भावात झालेल्या आरोप प्रत्यारोपावरुन चर्चेत आली. सभेदरम्यान आम्ही शांत राहुन सहकार्य केले मात्र त्यांच्या लोकांनी दंगा केल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. तर चेअरमन नविद मुश्रीफ यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली समाजासमोर चुकीची माहिती देऊ नये अशा शब्दात उत्तर दिले.
त्यामुळे प्रत्येक सभेत आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक गटामध्ये जोरदार रंगणारी घोषणाबाजी यंदा मंत्री मुश्रीफ व महाडिक गटामध्ये रंगली. सभा शांततेत होईल अशी अपेक्षा होती मात्र यंदाचीही सभा काहीशी गोंधळातच झाली. गोकुळची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली.
सभेच्या सुरुवातीपासूनच होणारा गोंधळ यंदा सभेच्या सुरुवातीला दिसला नाही. संचालिका शौमिका महाडिक व त्यांचे कार्यकर्ते सभेच्या सुरुवातीस शांतपणे बसून होते. चेअरमन नवीद मुश्रीफ यांचे सुमारे एक तासाचे प्रास्ताविक सर्वांनीचे शांतपणे ऐकून घेतले. यादरम्यान चेअरमन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणीने प्रश्न विचारले आहेत.
त्याची लाडका भाऊ म्हणून मी उत्तर देणार असा उल्लेख केला. त्यामुळे सभा शांतपणे होईल अशी अपेक्षा होती. मात्र संचालक संख्या वाढीच्या पोटनियम दुरुस्तीच्या मंजूरीवरुन संचालिका महाडिक व्यासपीठासमोर आल्या. त्यांनी या पोटनियम दुरुस्तीला विरोध असल्याचे सांगितले. तोच मंत्री मुश्रीफ गटाच्या व महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांकडुन घोषणा देण्यास सुरुवात झाली अन् शांततेत सुरु असलेल्या सभेचे रुपांतर सभा संपेपर्यंत गोंधळात झाले.
लाडक्या बहिणीचा माईक का घेतला?
ते जर मला लाडकी बहिण म्हणत असतील तर त्यांनी माझा माईक का काढून घेतला, असा प्रश्न संचालिका महाडिक यांनी केला. तसेच लाडक्या बहिणीला त्यांनी माईक द्यायला हवा होता. मला प्रश्न विचारु द्यायला हवे होते, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. एक दोन नव्हे तेरा रुपये वाढ दिल्या सभेमध्ये पोटनियम दुरुस्तीच्या मंजुरीला विरोध करण्यासाठी संचालिका महाडिक पुढे आल्या.
यावेळी मंत्री मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांकडुन एक दोन नव्हं तेरा रुपये वाढ दिल्या अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच नवीद मुश्रीफ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा ही घोषणा दिल्या. यावेळी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या. यामधून दोन्ही गटातील इर्ष्या दिसून आली.
सभा सभासदांची का कार्यकर्त्यांची वार्षिक सभेमध्ये नेहमीच सगळ्याच सत्ताधाऱ्यांकडून आपले कार्यकर्ते पुढे बसवले जातात. सभेदरम्यान या कार्यकर्त्यांकडुन घोषणबाजी करत गोंधळ निर्माण केला जातो. मागील वर्षीच्या सभेमध्येही सभा संपण्यापूर्वीच बहुतांश सभासदांनी सभास्थळ सोडले होते. यंदाही चेअरमन यांच्या प्रास्ताविक नंतर मागील बाजूस असलेले सभासद बाहेर पडले.
पुढच्या बाजूस नेत्यांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. त्यामुळे गोकुळ वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांसाठी आहे का कार्यकर्त्यांसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोंधळापासून आमदार पाटील गट बाजूला गोकुळच्या यापूर्वीच्या सभेमध्ये आमदार सतेज पाटील गट आणि माजी आमदार महादेवराव महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जायची.
यामधून सभेमध्ये गोंधळ निर्माण व्हायचा. पण यंदाच्या सभेमध्ये गोंधळापासुन आमदार सतेज पाटील गट काहीसा बाजूलाच होता. तर मंत्री मुश्रीफ व महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्येच घोषणाबाजी सुरु होती. भावाने सन्मानाने खुर्ची ठेवली संचालिका शौमिका महाडिक यांच्या प्रश्नाबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. तसेच त्यांना सभेमध्ये व्यासपीठावर येण्याची विनंती केली होती.
त्यामुळे सभेमध्ये व्यासपीठावर भावाने सन्मानाने बहिणीसाठी खुर्ची ठेवली होती. मात्र त्यांनी सभासदांमध्येच बसणे पसंत केल्याचे चेअरमन मुश्रीफ यांनी सांगितले. तरीही दंगा म्हणजे नेत्याच्या शब्दाला गालबोट ठरल्याप्रमाणे आम्ही शांत राहून सहकार्य केले. मात्र त्यांनी घोषणाबाजी करत दंगा केला. चेअरमन मुश्रीफ शांत बसण्याचे आवाहन करत होते.
तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दंगा सुरु होता. आपला नेता शांत राहण्याचे आवाहन करतो तरीही दंगा करणे म्हणजे नेत्यांच्या शब्दाला गालबोट लावल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.