पंजाबी गायकाच्या घराबाहेर गोळीबार
06:18 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बरनाला : पंजाबच्या बरनाला येथे पंजाबी गायक गुलाब सिद्धूच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. हा पूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झला आहे. हल्लेखोरांनी पंजाबी गायकाच्या घराच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. बाइकवरून आलेल्या 3 हल्लेखोरांनी हे कृत्य पेले आहे. घटनेवेळी गुलाब सिद्धू घरात नव्हता, परंतु त्याच्या परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या घटनेनंतर त्याचा परिवार घाबरून गेला आहे. तर याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
