सर्वात छोटा विमान प्रवास
केवळ 80 सेकंदांत संपतो प्रवास
प्रवासासाठी विमान हे सर्वात अत्याधुनिक साधन आहे. हवाईप्रवासाच्या मदतीने दीर्घ अंतरही अत्यंत कमी काळात पूर्ण करता येत. हवाई प्रवासासाठी कुठलाही मार्ग किंवा पूलाची गरज नसते. याचमुळे हवाईप्रवासाच्या मदतीने चहुबाजुने पाण्यात वेढलेल्या बेटांवरही जाता येते. जगातील सर्वात छोटा हवाईप्रवास कुठला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
जगातील सर्वात छोटा हवाईप्रवास केवळ 2.7 किलोमीटरचा असून हे अंतर कापण्यासाठी केवळ 80 सेकंद लागतात. हा हवाईप्रवास गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदला गेला आहे. हा अनोखा हवाईप्रवास स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटसमुहाचे दोन बेट वेस्ट्रे अणि पापा वेस्ट्रेदरम्यान संचालित होतो. या दोन्ही बेटांदरम्यान अंतर केवळ 2.7 किलोमीटर असून हे एक छोटे विमान केवळ 80 सेकंदांत पूर्ण करते.
विमानाला टेकऑफपासून लँडिंगपयंत 80 सेकंदांचा कालावधी लागतो. या उड्डाणाला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटा कमर्शियल फ्लाइट म्हणून नोंद करण्यात आले आहे. या दोन्ही बेटांवरील लोकांसाठी हवाईप्रवास हाच एकमेव पर्याय आहे.
या उड्डाणसाठी छोटे विमान वापरले जाते. ज्यातून एकावेळी 9-10 प्रवासीच प्रवास करू शकतात. हे विमान काही सेकंदात स्वत:च्या निर्धारित स्थळी पोहोचते. हे विमान दिवसांतून अनेकदा उड्डाण करत असल्याने तेथील रहिवाशांना याचा मोठा लाभ होतो.