For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ‘डेक्सट्रोज ड्रिप्स’चा तुटवडा

01:18 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ‘डेक्सट्रोज ड्रिप्स’चा तुटवडा
Advertisement

ग्लुकोज, हातमोज्यांचीही कमतरता : सहा महिन्यापूर्वीच साठा संपला

Advertisement

मडगाव : संपूर्ण दक्षिण गोव्याची मदार असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आता औषधांची कमतरता भासू लागल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना खुल्या मार्केटातून औषधे मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. डेक्सट्रोज ड्रिप्स, ग्लुकोज तसेच हातमोजे यांचा तुटवडा भासत आहे. ज्या औषधांची तसेच इतर वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासत आहे. उपलब्ध माहिती प्रमाणे ग्लुकोज तसेच इतर काही औषधांची कमतरता असून डॉक्टरांच्या वापरात येणारे हातमोजे तसेच इतर उपकरणांची देखील कमतरता आहे. वास्तविक वर्षभर पुरेल अशा साठ्याची तरतूद करणे आवश्यक असताना, याठिकाणी सहा महिन्यांच्या आतच आवश्यक औषधे व उपकरणांची कमतरता भासू लागली आहे.

दोन महिन्यांपासून तुटवडा

Advertisement

‘डेक्सट्रोज ड्रिप्स’साठी खुल्या बाजारात फारसे ग्राहक उपलब्ध नसल्याने, बऱ्याच फार्मसीमध्ये ते उपलब्ध होत नाही. त्यात दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात तुटवडा असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना ‘डेक्सट्रोज ड्रिप्स’ मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. ही समस्या गेल्या दोन महिन्यांपासून असून रूग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे. दक्षिण गोव्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने रूग्ण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येत असल्याने या इस्पितळावर सातत्याने ताण असतोच. गंभीर आजारी असलेल्या रूग्णांना येथून गोमेकॉत पाठवले जाते. रूग्णांची संख्या जास्त असल्याने औषधांचा तुटवडा भासत असल्याची चर्चा या ठिकाणी आहे. दरम्यान, ज्या औषधांचा तुटवडा आहे ती औषधे तसेच हातमोजे आणि इतर वैद्यकीय उपकरणे लवकर मिळवण्यासाठी निविदा जारी केल्या जातील अशी माहिती इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.