शॉर्ट-फॉर्म व्हिडिओमुळे मेंदूला होतेय नुकसान
1999 साली ‘द मॅट्रिक्स’ चित्रपट आला होता, तेव्हा लोकांना पहिल्यांदा आपण खऱ्या जगात आहोत का, एखाद्या अदृश्य सिस्टीममध्ये अडकलो आहोत, असा प्रश्न पडला होता. आज आम्ही डिजिटल जगतात अडकलो नसलो तरीही आमचा मेंदू अवश्य सातत्याने स्क्रॉलिंगच्या जाळ्यात गुंतत आहे. नव्या अध्ययनानुसार शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ मेंदूला नुकसान पोहोचविण्यासह हळूहळू त्याच्या सवयी बदलत आहे.
71 वेगवेगळी संशोधने आणि जवळपास 1 लाख लोकांवर आधारित मेगा-रिह्यू फीड्स, फीलिंग्स आणि फोकस पाहता सातत्याने शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याने ध्यान, भावना आणि मानसिक लयात छोटे छोटे परंतु सातत्याने बदल होत असल्याचे आढळून आले आहे. संशोधकांनी शालेय मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना अध्ययनात सामील करत लोक किती स्क्रॉल करतात, कधी स्क्रॉलिंग आपोआप सुरू होते आणि कधी रोखणे अवघड वाटते हे पाहिले गेले. तसेच एकाग्रता, स्मरणशक्ती, तणाव, झोप, एकाकीपणा आणि आत्मसन्मान यासारख्या पैलूंचाही विचार करण्यात आला.
जेथे मोठ्या प्रमाणात शॉर्टफॉर्म व्हिडिओचा वापर होता, तेथे प्रभाव किरकोळ होता, परंतु जवळपास सर्व ठिकाणी होता. उणे 0.10 ते उणे 0.30 ची ही छोटी घसरण मेंदू हळूहळू त्या वेगानुरुप होतोय, ज्यावर फीड चालते, असे दिसून आले. सर्वात मोठा पॅटर्न म्हणजे एसएफव्ही वापरकर्त्यांमध्ये दीर्घकाळापर्यंत एकाग्रता टिकविणे अवघड ठरत आहे. ते लक्ष गमावत नाहीत, परंतु लवकर थकतात, मेंदू बर्स्ट मोडमध्ये विचार करू लागतो, छोट्या झटक्यांसाठी एकाग्रता होते. वर्किंग मेमरी आणि एक्झिक्यूटिव्ह फंक्शनमध्येही किंचित घसरण दिसली. मेंदूला मंद आणि दीर्घ विचारांच्या गोष्टींसारखे एक पेज वाचणे किंवा कुठल्याही गोष्टीला न अडथळे आणता ऐकणे पूर्वीपेक्षा अधिक अवघड वाटू लागते. स्थिरता असहज जाणवू लागते.
भावनामंध्ये लवकर बदल
तणाव, अस्वस्थता आणि चिंतेत एक हलकी परंतु स्थायी वाढ दिसून आल्याचे अध्ययन दर्शविते. एकूण संबंध उणे 0.21 राहिला, म्हणजेच प्रभाव मोठा नाही, परंतु सातत्यपूर्ण आहे. तणाव-चिंतेत उणे 0.25 टक्क्यांपर्यंत प्रभावही दिसून आला. या तीव्र बदलाचे कारण म्हणजे भावना इतक्या लवकर येतात-जातात की, मेंदू त्यांच्यावर पूर्णपणे प्रक्रिया करू शकत नाही. आनंद झटक्यात अस्वस्थतेत बदलतो, उत्सुकता ईर्ष्येत आणि प्रत्येक भावना अर्धवट राहते. एसएफव्ही भावना संपवत नाही, केवळ त्यांची लय बिघडवितो.
प्रौढांवरही होतोय परिणाम
मोठे लोक सोशल मीडियाचा वापर सांभाळून करतात, यामुळे त्यांच्यावर प्रभाव कमी पडतो असे मानले जाते. परंतु अध्ययनानुसार त्यात सामील जवळपास 73 टक्के लोक प्रौढ होते आणि त्यांच्यावरील परिणाम किशोरांप्रमाणेच होते. मेंदू वयाने नव्हे तर माहितीच्या वेगाने प्रभावित होतोय. हा बदल मानवी मेंदूच्या मूलभुत रचनेशी जोडलेला आहे, त्याच्या वयाशी नाही.
नकारात्मक परिणाम
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे नियतकालिक सायकोलॉजिकल बुलेटिनमध्ये प्रकाशित अहवालात हे तथ्य समोर आले आहे. तर अन्य एका अहवालात 14 संशोधनांचे विश्लेषण करण्यात आले. यातून शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अधिक पाहिल्याने मानवी एकाग्रता कमी होत असल्याचे आढळून आले.
सर्वात मोठा प्रभाव
वापर अधिक काळ नव्हे तर नियंत्रणाबाहेर गेल्यावर अधिक नुकसान होते. म्हणजेच अॅपचा वापर रोखणे अवघड वाटू लागते. अशा प्रकरणांमध्ये उणे 0.20 ते उणे 0.30 पर्यंत प्रभाव दिसला. आत्मसन्मान आणि बॉडी इमेजवर एसएफव्हीचा कुठलाही ठोस एकतर्फी प्रभाव आढळला नाही. प्रभाव उणे 0.05 ते उणे 0.10 दरम्यान राहिला. याचे कारण प्लॅटफॉर्म अत्यंत अव्यवस्थित आहे. प्रत्येक सुंदर इन्फ्लुंएसरसोबत शेकडो आमच्यासारखे लोकही दिसतात. कुणी खराब जाणवून देते, तर कुणी चांगले, सरासरी सपाट होते. फ्लॅटफॉर्म एकाच दिशेने प्रभाव पाडू शकत नाही.