महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जुन्या तहसीलदार कार्यालयाला शॉर्टसर्किटचा धोका

10:32 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खुल्या फ्यूज-विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटनेची शक्यता : नव्याने वीजजोडणी करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : जुन्या सरकारी कार्यालयांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या इमारती शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जुने तहसीलदार कार्यालय येथे नेम्मदी केंद्र तसेच डायरी उतारा मिळणे आणि ट्रिब्युनलची विविध कागदपत्रे मिळतात. मात्र, त्या ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या धोकादायक स्थितीत असून कधी शॉर्टसर्किट होईल, याची शाश्वती नाही. तेव्हा तातडीने त्या कार्यालयातील नव्याने वीजजोडणी करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

जुन्या तहसीलदार कार्यालयातील तहसीलदारांच्या चेंबरसमोरच असलेल्या भिंतीवर वीजमीटर तसेच फ्यूज बसविण्यात आल्या आहेत. मात्र, या फ्यूज उघड्यावर आहेत तर तेथून इतर ठिकाणी जोडणी केलेल्या वाहिन्या तसेच खुल्या सोडण्यात आल्या आहेत. चुकून एखाद्याचा हात जरी लागला तरी त्याला विजेचा धक्का बसू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे वारंवार या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. सोमवारी दुपारी दोननंतर वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नेम्मदी केंद्र व इतर विभागातील काम पूर्णपणे ठप्प झाले.

शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असेल म्हणून तेथील कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिक ताटकळत थांबले. मात्र, त्यानंतर काही जणांना केवळ या कार्यालयातीलच वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली. याबाबत हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना कळविल्यानंतर ते दाखल झाले. मात्र, त्या धोकादायक वाहिन्या पाहून त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. सरकारी कार्यालयाची ही अवस्था पाहून सारेच अवाक् झाले असून याकडे तहसीलदार लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्व्हर डाऊन, वीजपुरवठा खंडित

नेम्मदी केंद्रामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सर्व्हर डाऊनची समस्या भेडसावली. जिल्हाधिकारी कार्यालयातून येथील नेम्मदी केंद्राला कनेक्शन दिले आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातीलच सर्व्हर खराब झाल्याने येथील नेम्मदी केंद्राचे काम  ठप्प झाले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या नेम्मदी केंद्रामध्येही सर्व्हर नसल्याने कामानिमित्त आलेल्या सर्वांनाच रिकाम्या हाती परतावे लागले. वीजपुरवठा खंडित झाल्याने आणखीनच गंभीर परिस्थिती झाली होती. कार्यालयातील या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किटने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का? असा प्रश्नही आता करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article