For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Umbraj Fire Incident | उंब्रजला वीज मीटर मधील शाॅर्ट सर्कीटने भीषण आग ; लाखोंचे नुकसान

01:15 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
umbraj fire incident   उंब्रजला वीज मीटर मधील शाॅर्ट सर्कीटने भीषण आग   लाखोंचे नुकसान
Advertisement

                      उंब्रजमध्ये एबीपी प्लाझा बिल्डिंगला आग

Advertisement

उंब्रज - उंब्रज चाफळ रोडला पायनर मेडिकलच्या पाठीमागे असणाऱ्या एबीपी प्लाझा बिल्डिंग मधील विज मीटरला शॉक सर्किट होऊन अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी २७ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास घडली. मोठ्या प्रमाणावर ज्वाला व धूर बाहेर आल्याने हा प्रकार तेथील दुकानदारांच्या लक्षात आला याआगीत ३२ डिजीटल मीटर जळून खाक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीत, मीटर, वायरिंगसह इतर साहित्य जळून लाखोंच्या घरात नुकसान झाले आहे. या बिल्डिंगमधून स्मार्ट मीटर बसवण्यास मोठा विरोध होता त्यामुळे आग नेमकी कशी लागली याचा तपास होणे गरजेचे आहे.

दरम्यान आगीत संपूर्ण बिल्डिंगचे असणारे मीटर जळून खाक झाल्याने पुढील काही दिवस संपूर्ण इमारत अंधारात गेली आहे. उंब्रज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर खबाले यांच्यासह स्थानिक दुकानदारानी ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला . गेल्या तीन महिन्यांपूर्वी याच इमारतीतील एका दुकान गाळ्यात आग लागली होती. दरम्यान शुक्रवारी लागलेल्या आगीत इमारतीच्या जीन्याखालील सर्व वीज मीटर जळून खाक झाले आहेत.

Advertisement

उंब्रज येथील चाफळ रोडला रमेश रामचंद्र पवार सुमित संजय भस्मे रामचंद्र श्रीपती अर्जुगडे या तिघांच्या मालकीची एबीपी प्लाझा ही बिल्डिंग असून येथे या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल मेडिकल किराणा दुकाने कापड व चप्पल दुकान तसेच पतसंस्था आहे शुक्रवारी सकाळी या बिल्डिंगच्या जिन्याखाली असणाऱ्या मीटर मध्ये अचानक आग लागली या अग्नी क्षणात रोज रूप धारण केल्याने एकाच ठिकाणी असणारे सुमारे 32 डिजिटल मीटर जळून खाक झाले आहेत मोठ्या प्रमाणावर ज्वाला व धुराचे लोट बाहेर आल्यानंतर शेजारील दुकानदारांच्या लक्षात हा प्रकार आला त्यानंतर त्यांनी संबंधित माहिती वायरमेनला देऊन वीज कनेक्शन वीज प्रवाह बंद करायला लावला व त्यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले उंब्रज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर खबर यांनीही आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले. याआगीत सर्व मित्र जळून व इतर साहित्य जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या बिल्डिंग मधून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध केला जात होता डिजिटल मीटर च्या माध्यमातून येथे सर्वांना वीज कनेक्शन सुरू होते मात्र स्मार्ट मीटर बसवण्याच्या नादात ही आग लागली का असा संशय निर्माण झाला असून या आगेचे मुख्य कारण शोधून काढण्यासाठी तपास व्हावा अशी मागणी बिल्डिंग मालकांनी केली आहे दरम्यान आग लागून गंभीर घटना घडल्यानंतरही महावितरणचे अधिकारी पाच तास उलटून ही घटनास्थळी पाहणे करण्यासाठी आले नव्हते त्यामुळे या बिल्डिंगमध्ये दुकानदार व व्यवसाय करणे संताप व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.