Kolhapur Bank fire | भोगावती साखर कारखान्यातील जिल्हा बँक शाखेला शॉर्टसर्किटने आग ; 25 लाखांचे नुकसान
भोगावती कारखान्यातील बँक शाखेत आग,
भोगावती : शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावर असणाऱ्या जिल्हा बॅकेच्या शाखेला मध्यरात्री दीडच्या सुमारास शाॅर्टसर्किटने आग लागली.आगीमध्ये संगणक,काॅऊन्टर,इलेक्ट्रीकल साहित्य व खुर्च्यासह महत्वाची कागदपत्रे जळुन खाक झाली आहेत.या आगीमुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाखाहुन अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,जिल्हा बॅकेची भोगावती कारखान्यावर शाखा आहे.काल सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास शाखेतुन धुर येत असल्याचे व आग लागल्याचे कारखाना सुरक्षारक्षकांना दिसुन आले.त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला.तोपर्यंत आगीमध्ये काॅऊन्टर,संगणक, इलेक्ट्रीकल साहित्य, कागदपत्रे जळुन खाक झाली.सुदैवाने बॅकेमधील रोखडसह सोने सुरक्षित राहीले आहे.
जिल्हा बॅकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.या घटनेचा अद्याप पंचनामा झालेला नाही.मात्र बॅकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन आगीची पहाणी केली.