Sangli : माडग्याळात शॉर्टसर्किटमुळे दुकाने जळून खाक ; लाखोंचे नुकसान
शॉर्टसर्किटमुळे सुमारे १२ ते १५ लाखांचे आर्थिक नुकसान
माडग्याळ : जत तालुक्यातील माडग्याळ येथे शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किट मूळे एक किराणा दुकान, एक इलेक्ट्रिक दुकान, एक ऑटोमोबाईल दुकान व एक टीव्ही रिपेरी दुकान अशी दुकाने जळून सुमारे बारा ते पंधरा लाखाचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, जत उमदी रोडवर गावालगत संत बाळूमामा या नावाने दशरथ रोहे व सचिन रोडे या बंधूंचे इलेक्ट्रिक दुकान आहे. घरगुती लाईट फिटिंगचे साहित्य विक्रीचे दुकान आहे यामध्ये जवळपास सात ते आठ लाख रुपयाचे इलेक्ट्रिक साहित्य होते. ते नेहमीप्रमाणे आपले पुकान सायंकाळी सहाच्या सुमारास बंद करून आपल्या गावी गेले होते. मध्यरात्रीच्या दरम्यान दुकानातील लाईटमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाल्यामुळे दुकानातील साहित्याला आग लागली.
समोरून शटर बंद असल्यामुळे आग लागण्याचे लवकर लक्षात आले नाही व रात्री बाराची वेळ असल्यामुळे नागरिकही उपस्थित नव्हते. त्यामुळे एकदम आगीने भड़का घेतला. यामध्ये दुकानातील सर्वच इलेक्ट्रिक साहित्य वायरिंग, में त्र्न, फिटिंग साहित्य अशा पद्धतीचे सात ते आठ लाख रुपयांचे साहित्य जळून त्याची राख झालेली आहे. तसेच लगत असणाऱ्या सिद्धेश्वर ऑटोमोबाईल्स या दुकानातही आग पसरुन मलू धुमाळे यांचे मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान होते.
यामधील ही संपूर्ण साहित्य जळून जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. यामध्ये एक जूनी मोटरसायकल ही जळालेली आहे व दुकानातील मोटरसायकल दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य इत्यादी जळून त्यांचेही जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे.
या दुकानाला लागूनच गणेश इंगळे यांचे इंगळे इलेक्ट्रिकल्स या नावाने टीव्ही दुरुस्तीचे दुकान होते. तेथीलही तीन एलईडी टीव्ही जळून खाक झालेल्या आहेत. जवळपास दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. काही साहित्य दुकान उघडून बाहेर काढल्यामुळे सुरक्षित राहिलेले आहे. बाळूमामा इलेक्ट्रिक दुकानाला लागून असणारे संतोष सावंत यांचे किराणा दुकान व आईस्क्रीम पार्लर यामधीलडी काही साहित्य जळून राख झाले आहे.
मात्र आईस्क्रीम पार्लरमधील साहित्य नागरिकांनी वेळीच सावध होऊन बाहेर काढल्यामुळे थोड्याफार प्रमाणात साहित्य वाचले आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे नागरिकांची उपस्थितीही कमी होती व पाणीही वेळेत मिळाले नसल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरुन यात तीन ते चार दुकानातील संपूर्ण साहित्याची जळून खाक झाले आहे.
ऐन दिवाळीच्या सणात या दुकानदारावरती संकट उभे राहिलेले दिसून येते गोरगरीब दुकानदारांवरती विविध बँकांचे कर्ज काढून उभे केलेले व्यवसाय क्षणात आधीच्या भक्षस्थानी पडून संपूर्ण साहित्याची राख झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.