For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश चतुर्थीसाठी खरेदीची लगबग

06:37 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेश चतुर्थीसाठी खरेदीची लगबग
Advertisement

भक्तांना गणरायांचे वेध, सजावट साहित्याला बाजारपेठेत मागणी

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

गणेश चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली असल्याने बाजारात तयारीसाठीची लगबग वाढली असून, गोमंतकीय जनतेला सर्वत्र गणरायांचे वेध लागले आहे. चतुर्थीनिमित्त विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे.

Advertisement

राजधानी पणजीसह राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये विविध साहित्य आलेले आहे. सजावटीसाठी लागणारे मोठ्या प्रकारचे गणेश मुखवटे, रंगीबेरंगी प्लास्टिक फुले, देखाव्यासाठी लागणारे रंगीत कपडे, विद्युत रोषणाईच्या माळा आल्या आहेत.

दरवर्षी, वेगवेगळ्dया पद्धतीचे साहित्य खास चतुर्थीसाठी दाखल होत असते. दिल्ली, मुंबई, कोलकाता आदी भागांबरोबरच राज्यातूनही वेगवेगळ्dया प्रकारचे साहित्य, अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध आहे. आकर्षक लाकडी मखरे बाजारात आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे खास आकर्षक अशी थर्माकोलची मखरेही आलेली आहेत. या मखरांची किंमत 2000 ते 5000 रुपयांपर्यंत आहेत. सुंदर गणेशमूर्तीही भाविकांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे प्लास्टिक फुले रंग आणि प्रकारानुसार 50 ते 500 रुपयेपर्यंत विकली जात आहेत.

रंगीत कपडे साधारणत: 100 ते 500 रुपये प्रति मीटर दराने विकले जात आहे तर विद्युतरोषणाईच्या माळा 200 ते 1000 रुपये रंग, प्रकार आणि लांबीनुसार विकल्या जात आहे. तसेच इतर एलईडी बल्ब विक्रीस उपलब्ध आहे.

चतुर्थीला अवघे काही दिवस राहिल्याने आता चित्रशाळांमध्ये गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरविला जात आहे. राज्यातील घराघरांत साफसफाई सुरू आहे. सार्वजनिक देखाव्यांसाठी काही युवकांकडून रात्री जागू लागल्या आहेत. माटोळीचे साहित्य गोळा करण्यासाठी कष्टकरी लोकांनी डोंगर माथ्यावर वेगवेगळ्dया ठिकाणी हेरून ठेवले आहे. अनेक संस्था, मंडळे आणि काही सरकारी कार्यलयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी महिनाभर अगोदर देखाव्याची तयारी सुरू केली होती. आता अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याने देखाव्यांचे काम जोरात सुरू आहे. बहुतांश संघ आता पर्यावरणपूरक असे देखाव्यांवर जास्त भर देत आहे.

अष्टमी फेरीत विविध साहित्य

मांडवीतीरी भरलेल्या अष्टमीची फेरीत चतुर्थीला लागणारे अनेक प्रकारचे साहित्य विक्रीस आले आहे. यात खास लाकडी पाट, गणपतीचे आसन असलेली चवाई, तसेच आदोळी इतर सजावट साहित्य आहे. तसेच लाकडी माटोळी विक्रीस उपलब्ध आहे. पाट 500 ते 5 हजारपर्यंत जोड विकली जात आहे. तसेच गणपतीची लाकडी आसन चवाई 2 हजार ते 5 हजार विकली जात आहे. तसेच इतर विविध साहित्य उपलब्ध आहे.

पूर्वीसारखी महिनाभर चालणारी घराची आकर्षक सजावट कमी झाली आहे. रेडीमेड साहित्यावर लोकांचा भर असल्याचे दिसून येते, त्यामुळे शेकडो प्रकारचे रेडीमेड संच, मखरे, बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. आज मोबाईलच्या युगात ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे....

Advertisement
Tags :

.