For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकवली बाजारपेठेत दुकानाला आग लागून मोठे नुकसान

03:01 PM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
कणकवली बाजारपेठेत दुकानाला आग लागून मोठे नुकसान
Advertisement

रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

Advertisement

कणकवली : कणकवली शहरातील मुख्य बाजारपेठेत रविवारी रात्री बाराच्या सुमारास महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक लागलेल्या आगीत साड्या, ड्रेस छत्री रेनकोट यांच्यासहित अनेक वस्तूंचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती समजतात अनेक युवकांनी व नागरिकांनी आग वीजवण्यासाठी धाव घेतली. तसेच नगरपंचायत बंब दाखल झाला. दरम्यान सदरची आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दुकानाला लागून दोन्ही बाजूला अनेक दुकाने आहेत. स्थानिकांनी आज विजविण्यासाठी केलेला प्रयत्नना यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आगीची घटना समजतात लगतच्या दुकानदारांमध्येही भीतीच वातावरण निर्माण झाले होते. पण अखेर युवा वर्ग व संस्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रण ठेवण्यात यश आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घटनास्थळी पोहोचत मदत कार्य केले. मे महिन्याचा सीजन असल्याने महाडिक लेडीज टेलर्स या दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्री रेनकोट शिलाई मशीन विक्रीसाठी हे आणण्यात आले होते. हे सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. तसेच फर्निचर वायरिंग इंटेरियर या सर्व वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.