For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | शाहूपुरीत दुकान फोडून ८ तोळे लंपास

12:17 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   शाहूपुरीत दुकान फोडून ८ तोळे लंपास
Advertisement

                                     कोल्हापुरात मध्यरात्री चोरी

Advertisement

कोल्हापूर - शाहूपुरी येथील किराणा दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून साडे आठ तोळे सोने, रोख ५ हजार आणी १० साड्या असा सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहूपुरी ४ थी गल्ली येथे ही घटना घडली. याबाबतची फिर्याद छाया सूर्यकांत भाळवणे (वय ६६, रा. टाकाळा रोड, माळी कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया भाळवणे यांच्या मालकीचे शाहूपुरी चौच्या गल्लीमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. नातेवाईकांच्या लग्नामध्ये वापरण्यासाठी त्यांनी बँकेच्या लॉकरमधून सोने ताब्यात घेतले होते. लग्नसमारंभ आटोपून त्या मंगळवारी दुकानात आल्या होत्या. सर्व सोनेही त्यांनी सोबत आणले होते.

Advertisement

मात्र दुकानच्या गडबडीमध्ये सोने लॉकरला ठेवण्याचे राहून गेले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करत असताना त्यांनी सोने अॅल्युमिनीअमच्या एका पिंपामध्ये ठेवले होते. बुधवारी सकाळी त्या दुकानात आल्या असता, त्यांना दुकानातील साहित्य विस्कटल्याचे दिसले.

दुकानामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सोने जागेवर आहे का पाहिले असता, सोने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

८ तोळे सोने, १० साड्या, रोख ५ हजार
२५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे गोठ, २० ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, ९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ रिंग, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, १० ग्रॅम वजनाची माळ, ३ ग्रॅ म वजनाचे सोन्याचे मनी, १० साड्या, रोख ५ हजार रुपये असा सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

चोरटा माहितगार
शाहूपुरी चौथ्या गल्लीमध्ये भाळवणे यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. त्यांची सून आणि नातू दुकानामध्ये मदत करतात. या ठिकाणी ८ तोळे दागिने असण्याची शक्यता धूसर आहे. मात्र चोरट्याने दागिने ठेवलेल्या पिंपातील साहित्य आणि साड्या लंपास केल्या आहेत. यामुळे चोरटा माहितगार असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :

.