For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुकाने फोडणाऱ्या सराईत आरोपीस अटक

02:34 PM Jan 25, 2025 IST | Radhika Patil
दुकाने फोडणाऱ्या सराईत आरोपीस अटक
Advertisement

सातारा : 

Advertisement

सातारा शहरातील रविवार पेठ येथील हॉटेलचे शटर उचकटून चोरट्याने रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केला होता. या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून 75 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संतोष रामचंद्र गावडे (वय 38, रा. बैंडवाडी पो. आसनगाव ता. जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर घरफोडीचे 17 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी. बी. पथकाने माहिती काढून रात्रीचे दुकाने फोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करुन एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले होते. त्याच्याकडे झालेल्या चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने ही चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच अन्य ठिकाणी देखील दुकानामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वी सातारा शहर तसेच शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारे चोरी केली असलेची सांगितले. आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीचे 02 मोबाईल फोन, रोख रक्कम 4 हजार, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Advertisement

ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले. मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे, सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुनिल मोहिते, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी केलेली आहे.

Advertisement
Tags :

.