अमेरिकेच्या इडाहो येथे गोळीबार, 3 जणांचा मृत्यू
06:42 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
ट्विन फॉल्स:
Advertisement
अमेरिकेच्या इडाहो प्रांतातील ट्विन फॉल्स येथील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार प्रसिद्ध बर्गर चेन इन-एन-आउट रेस्टॉरंटमध्ये झाला असून ते काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले होते. हल्लेखोर मारला गेल्याने समुदायावरील धोका टळला आहे. हल्लेखोराचे नाव अन् हल्ल्यामागील उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ट्विन फॉल्स पोलीस प्रमुख मॅथ्यू हिक्स यांनी सांगितले. इन-अॅन-आउटनजीक हल्लेखोर एआर-स्टाइल रायफलने गोळीबार करत होता. यानंतर एका इसमाने हल्लेखोराच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. हल्लेखोराने काळ्या रंगाचे कपडे घातले होते असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेदरम्यान परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते.
Advertisement
Advertisement