For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझामध्ये गोळीबार, 32 पॅलेस्टिनींचा मृत्यू

06:20 AM Jun 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
गाझामध्ये गोळीबार  32 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Advertisement

मदतकेंद्रावर जाताना घडला प्रकार : 175 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ राफा

गाझापट्टीत इस्रायलचे समर्थनप्राप्त एका संघटनेकडून मदतसामग्री मिळविण्यासाठी जाणाऱ्या 32 पॅलेस्टिनींना गोळीबारात जीव गमवावा लागला आहे. रेडक्रॉसकडून चालविण्यात येणाऱ्या एका रुग्णालयाने ही माहिती रविवारी दिली आहे. याच रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टिनींचे मृतदेह आणले गेले. या गोळीबारात 175 जण जखमी झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर गोळीबार कुणी केला हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

Advertisement

गाझा ह्युमॅनिटेरियन फौंडेशनकडून मदतसामग्रीचे वितरण करताना अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलच्या सैनिकांनी वितरण स्थळांवर गर्दी केलेल्या लोकांवर गोळीबार केल्याचा दावा काही जणांनी केला आहे.

मदतसामग्रीचे वाटप होत असलेल्या स्थळांची सुरक्षा करणाऱ्या खासगी सुरक्षारक्षाकांनी गोळीबार केला नाही असे फौंडेशनने म्हटले आहे. तर इस्रायलच्या सैन्याने इशाऱ्याच्या स्वरुपात गोळीबार केल्याचे मान्य केले आहे. फौंडेशनने रविवारी सकाळी 16 ट्रक्सद्वारे मदतसामग्री पाठविली होती, त्यावेळी कुठलाही प्रकार घडला नव्हता.

गाझामध्ये ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या संघर्षामुळे स्थिती अत्यंत बिघडली आहे. सातत्याने संघर्ष होत असल्याने गाझामधील 20 लाखाहून अधिक लोक उपासमारी सदृश स्थितीला तोंड देत आहेत. मोठ्या संख्येत लोक पोट भरण्यासाठी बाहेरून येणाऱ्या मदतीवर निर्भर आहेत.

पॅलेस्टिनींनी केला होता हल्ला

पॅलेस्टिनींनी मंगळवारी इस्रायलच्या सहाय्य केंद्रावर हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान झालेल्या गोळीबारात एका इसमाचा मृत्यू झाला होता तर 48 जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या सैन्याकडून मदतसामग्रीचे वाटप करताना विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.