मेक्सिकोतील पर्यटनस्थळी गोळीबार, महिलेचा मृत्यू
06:50 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी
Advertisement
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या युनेस्को वारसास्थळावर झालेल्या एका गोळीबारात 32 वर्षीय पर्यटक कॅनेडियन महिलेचा मृत्यू झाला आहे. तर हल्लेखोराने यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत.
Advertisement
टियोतिकहुआकान पिरॅमिड स्थळाच्या पिरॅमिड ऑफ द मून या ठिकाणी गोळीबार झाल्यावर लोक सैरावैरा पळू लागले. तर हल्लेखोर बेछूट गोळीबार करत होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक बंदूक, धारदार अस्त्र आणि काडतुसं मिळाली आहेत. तर जखमींमध्ये दोन कोलंबियन, एक रशियन आणि एक कॅनेडियन नागरिक सामील असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराची ओळख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी गोळीबाराच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
Advertisement