गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये गोळीबार, 4 ठार
06:08 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुवाहाटी
Advertisement
आसामच्या गुवाहाटीमध्ये सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये इसमाने 6 जणांवर गोळीबार केला, यात 5 जणांचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला आहे. मृतांमध्ये एकाच परिवारातील 4 जणांचा समावेश आहे. यात हॉटेल मालकाची पत्नी आणि मुलगाही सामील आहे. गोळीबाराचे कारण हॉटेलच्या भाडेकराराशी निगडित संपत्ती वाद असल्याचे समजते. आरोपी घनकांत गोगोईने मागील वर्षी हे हॉटेल भाडेतत्वावर चालवायला घेतले होते. परंतु मागील काही काळापासून हॉटेल मालकाच्या परिवारासोबत त्याचा भाडेकरारावरून वाद सुरू होता
Advertisement
Advertisement
