For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहूवाडीत धक्कादायक घटना ; पैशाच्या वादातून थरकाप! मुलाने 85 वर्षीय वडिलांचा केला निर्घृण खून

12:53 PM Feb 13, 2026 IST | NEETA POTDAR
शाहूवाडीत धक्कादायक घटना   पैशाच्या वादातून थरकाप  मुलाने 85 वर्षीय वडिलांचा केला निर्घृण खून
Advertisement

                                    शाहूवाडीत पैशाच्या हव्यासापोटी मुलगाच ठरला बापाचा काळ

Advertisement

शाहूवाडी : घरातील बॅगेत ठेवलेले पैसे कोणी घेतले या कारणातून झालेल्या वादात वडील दत्ताराम संभाजी केसरकर वय 85 मुळगाव गावडी सध्या राहणार उचत यांचा त्यांचाच मुलगा संतोष दत्तात्रय केसरकर वय 40 यांने डोक्यावर वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्रीच्या दरम्यान सदर घटना घडली या हल्ल्यात दत्तात्रय केसरकर हे जागीच मृत झाले .या प्रकरणी संतोष केसरकर यांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे .घटनेची फिर्याद सौ. साधना संतोष केसरकर यांनी दिली.

      पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय केसरकर यांचे मूळ गाव गावडी  आहे .त्यांचा मुलगा संतोष केसरकर हा वडील व आपली पत्नी आणि मुलं यांच्या समवेत उचत येते आपल्या घरात राहत होता. संतोष केसरकर हा कोल्हापूर येथे नोकरीस जात होता. त्याने घरात बॅगेत ठेवलेले पैसे सापडत नव्हते यावरून पत्नी व अन्य कुटुंबीयाशी त्याने घरात वाद-विवाद सुरू केला. मी बाहेरून परत येईपर्यंत  माझे पैसे नाही मिळाले तर मी तुम्हाला सोडणार नाही अशी त्याने धमकी दिली.

गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान त्यांची पत्नी व मुलं हे शाळेचे गॅदरिंग बघण्यासाठी मलकपू येथे गेले होते .यावेळी घरात संतोषचे वडील दत्ताराम केसरकर हे एकटेच होते .या संधीचा फायदा घेत संतोष याने वडिलांच्या डोक्यावर वर्मी घाव घातला. या हल्ल्यात दत्ताराम केसरकर हे जागीच मृत झाले. खुनचा पुरावा नष्ट करण्यासाठी फरशीवर सांडलेले रक्त ओढणीने पुसण्याचा त्याने प्रयत्न केला. खून झाल्याची माहिती नागरिकांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीसाशी संपर्क साधला.दरम्यान नागरिकांनी सतर्कता घेत संशयित संतोष केसरकर याला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. 
       
प्रामाणिक आणि निष्पाप वडील प्राणाला मुकले
 
दत्ताराम केसरकर हे माजी सैनिक म्हणून देश सेवा करून सेवानिवृत्त झाले होते. प्रामाणिक सर्वांशी मिळून मिसळून वागणारे म्हणून ते सर्वत्र परिचित होतात .दररोज मलकापूरला येऊन वर्तमानपत्र घेऊन जाणे , सामाजिक कार्यात सहभाग घेणे आपल्या मूळ गाव गावडी येथे विविध कामासाठी किंवा समाजातील कार्यक्रमासाठी जाणे अस एक सर्वासी मिळून मिसळून स्वभावाने वागणारे दत्ताराम केसरकर यांचा मुलगा याने खून केला. या घडलेल्या घटनेने परिसरासह गावडी पंचक्रोशीतून देखील हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement

    प्रामाणिक बापाच्या जिवनाची दुर्दशा 

दत्ताराम केसरकर यांना दोन मुलगे आहेत दुसरा मुलगा देखील अशाच एका विकृत मनोवृत्तीने त्यांच्यापासून अनेक वर्ष झाले परागंदा झाला आहे .त्यात आता जवळ असलेल्या या दुसऱ्या मुलांन पैशाच्या हव्यासापोटी बापाचा जीव घेतला. यामुळे एक प्रामाणिक कष्टकरी आणि कुटुंब वत्सल्य असलेल्या दत्ताराम केसरकर यांच्या या दुर्दैव मृत्यूने गावडीसह परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. एका प्रामाणिक बापाच्या जीवनाची ही दुर्दशा झाल्याची चर्चा सुरू होती.

गावाकडची ओढ कायमच होती

दत्ताराम केसरकर यांच मुळगाव गावडी मलकापूर पासून जवळपास 35 ते 40 किलोमीटर अंतरावर. मात्र त्यांनी सेनादलातून सेवानिवृत्त झाले आणि मलकापूर शहरा नजीक गावच्या हद्दीत जागा घेऊन घर बांधलं .नातवांचे शिक्षण आणि भविष्याची स्वप्न रंगवत आपल्या परिवारासोबत ते राहत होते .मात्र गावडी या आपल्या गावाकडे त्यांची असलेली ओढ कायमच होती .त्यामुळे गावातील नागरिकांच्यात त्यांच्या मृत्यून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी भेट देऊन पंचनामा करून अधिक माहिती घेतली. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement
Tags :

.