Sangli Crime | सांगलीत संतापाची लाट! मोठ्यांच्या वादात निष्पाप १३ वर्षीय वेदांत बंडगरचा बळी; डोळ्यात गोळी घालून हत्या!
सांगली : हमालीच्याबादातून नेते आणि मोठ्या माणसाचा बाद असताना या बादाशी काहीही संबध नसलेल्या निष्पाप बेंदात बंडगर या अवघ्या तेरा वर्षाच्या लहान मुलाच्या डोळयात गोळी घालुन त्याची हत्या केल्याच्या घटनेने सांगलीत संतापाची लाट उसळली आहे.
डोके सुन्न करणाऱ्या या घटनेनेसांगली शहर हादरून गेले आहे. या प्रकरणातील संशयीत निलेश गडदेलातात्काळ शोधून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी शहरातून केली जात आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडली. पोलीस अधीक्षकांनी आरोपीच्या शोधासाठी एलसीबीसह पोलिसांची दोन पथके सांगली जिल्हयासह कर्नाटकाकडे पाठविली आहेत.
घटनेनंतर सांगली सिव्हिल हॉ स्पिटलजवळ चंडगर यांच्या कार्यकत्र्यासहअभयनगर, संजयनगर, येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मनपा स्थायी सभापती अतुल माने, माजी नगरसेवक मनोज सरगर, मागी नगरसेवक राजू गवळी यानीही सिव्हिलकडे धाव घेतली. येथे पोलिसांचा बंशेबस्त ठेवला होता,
गुन्हेगाराला गांजाचे व्यसन
गोळीबार करणारा निलेश गडदे हा एक पाय ओढत चालत असे. मागील काही महिन्यापासून त्याला गांजाचे व्यसन लागले होते. तो सतत नशेमध्ये असायचा, गुरूवारी त्याच्या क्रुरतेचा कळस झाला आणि या प्रकारात निष्पाप बेदांतचा बळी गेला. ठार झाल्यानंतर सिव्हीलमध्ये वेदांतचा मृतदेह पाहण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. त्याच्या डोळयाच्या आत गोळी बराच वेळ तशीच होती.