For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : सांगलीत धक्कादायक प्रकार, सोशल मीडियातून ओळख वाढवून विनयभंग

06:02 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगलीत धक्कादायक प्रकार  सोशल मीडियातून ओळख वाढवून विनयभंग
Advertisement

                                    सांगलीत अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

Advertisement

सांगली : सोशल मीडियावरील संभाषणाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. असे कृत्य करणारा संशयितही अल्पवयीन असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शिक्षण घेत असून ती शिक्षणाच्या निमित्ताने नेहमी सांगलीत येत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलाने तिच्याशीवर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाषण सुरू ठेवले होते. तिच्या घरापासून तो तिचा दुचाकीवरून सतत पाठलाग करत होता. तिला आपल्याबरोबर फिरायला येण्याची गळ घालत होता. दोन दिवसापूर्वी त्याने तिला गाठून तू माझ्याबरोबर फिरायला आली नाहीस तर सोशल मीडियावरील संभाषणाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

Advertisement

तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आत्ताच माझ्याबरोबर फिरायला चल म्हणत तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य संशयिताने केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी विश्रामबाग पोलिसात संशयिताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Advertisement
Tags :

.