For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्येही एक धक्कादायक घटना

01:03 PM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्येही एक धक्कादायक घटना
Advertisement

प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी चढवली अंगावर 

Advertisement

पिंपरी चिंचवड : पुण्यात पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. यात प्रेयसीबरोबर एक तरूण बोलत आहे हे पाहून प्रियकराने त्या तरूणाच्या अंगावर चारचाकी गाडीच चढवली आहे. यात तो तरूण गंभीर जखमी झाला आहे. अंगावर गाडी घालणाऱ्या प्रियकरालाही गजाआड करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकरा घडला.  पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहराच्या यशवंत नगर येखीली शंकर चौधरी चौक परिसरात एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहीले. त्यामुळे प्रियकराला राग अनावर झाला. त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या तरूणाच्या अंगावर चारचाकी घातली. यात तो तरूण जबर जखमी झाला आहे. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय. सी. एम. रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात निलेश शिंदे हा तरुण जखमी झाला आहे. आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून सुशील काळेला राग अनावर झाला. त्याने आपली चार चाकी गाडी त्याने निलेश शिंदे यांच्या अंगावर घातली. दरम्यान या प्रकरणावरून पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात 307 अंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.