For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैद्यकीय क्षेत्राला काळिमा! मालेगावात 16 वर्षीय बालिकेची गुप्त प्रसूती करून बाळ विकण्याचा प्रयत्न

04:28 PM Jun 08, 2026 IST | NEETA POTDAR
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा   मालेगावात 16 वर्षीय बालिकेची गुप्त प्रसूती करून बाळ विकण्याचा प्रयत्न
Advertisement

Advertisement

नाशिक - कोणताही आजार असो किंवा आपले कुठले दूखने असो आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो,तोच डॉक्टर जर तुमचा फायदा उचलणारा निघाला तर, मालेगाव शहरात माणुसकीला आणि वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे... गेल्या बऱ्याच दिवसांपासुन भारतात अवैध गर्भपात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.. असेच काहीसे प्रकरण आता मालेगाव शहरातुन पण समोर आले आहे... गर्भवती असलेल्या एका 16 वर्षीय बालिकेची कुठलीही नोंद न करता खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. त्यानंतर बालिकेने जन्म दिलेल्या नवजात बाळाला विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगावमधील या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे..

काय आहे प्रकरण-

Advertisement

मिळालेल्या माहीतीनुसार, मालेगाव सामान्य रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक जो या घटनेचा मुख्य आरोपी आहे, त्याने एका अज्ञात व्यक्तीकडुन 16 वर्षीय अल्पवयीन बालकेशी शाररीक संबंध प्रस्थापित करुन तिला गर्भवती केले. तिला पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले... ही अल्पवयीन मुलगी गर्भवती आहे हे कोणाला ही माहीत नाही.. या संदर्भात कोणतेही नोंद न करता खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. त्यानंतर बालिकेने जन्म दिलेल्या नवजात बाळाला विक्री करण्याचा प्रयत्न झाला..

याप्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जितेंद्र डोलारे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन याबाबत माहिती दिली होती.  प्रसुतीनंतर सदर अल्पवयीन माता फरार असून नवजात बालक देखील अद्याप मिळून आले नाही. डॉ. डांगे हे यापूर्वी मालेगाव सामान्य रुग्णालयात कार्यरत होते. त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली असून एका फोन कॉलवरुन या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. प्रकरणी चार डॉक्टरांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालेगावमधील या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे..

Advertisement
Tags :

.