For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; 17 वर्षीय मुलीवर अत्याचार, तरुणास अटक

02:23 PM Jan 19, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापुरात धक्कादायक प्रकार  17 वर्षीय मुलीवर अत्याचार  तरुणास अटक
Advertisement

                                             कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Advertisement

कोल्हापूर : सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १७) रात्री उघडकीस आला होता. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा लक्षतीर्थ वसाहत परिसरात पाठलाग करून प्रेम सचिन हेगडे (वय २२, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करुन मुलीची सुटका केली. या घटनेमुळे शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्षतीर्थ वसाहत परिसरात प्रेम हेगडे हा सुवर्ण कारागीराचे काम करतो. त्याची सोशल मिडीयाच्या माध्यामातून एका तरुणीसोबत ओळख झाली होती यातूनच त्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केले होते. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास तो मुलीला दुचाकीवरून घेऊन गेला. उजळाईवाडी,रमण मळा येथे निर्जन ठिकाणी त्याने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्याने मुलीला घराजवळ सोडले. दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी शोधाशोष सुरू केली होती. ती प्रेम हेगडे याच्या दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Advertisement

शनिवारी रात्री लक्ष्मीपुरीत तणाव,
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. यामुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याबाहेर ३०० ते ४०० जणांचा जमाव शनिवारी रात्री जमला होता. हेगडे याच्या अटकेचा आग्रह धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. लक्ष्मीपुरी पोलिसांच्या पथकाने लक्षतीर्थ वसाहतीत जाऊन हेगडे याला पाठलाग करून पकडले. त्याच्यावर यापूर्वी दुचाकी चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली.

Advertisement
Tags :

.