Kolhapur | कसबा बावड्यात धक्कादायक घटना; २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूची राहत्या घरी आत्महत्या
कसबा बावड्यातील तरुण खेळाडूच्या निधनाने परिसरात हळहळ
कसबा बावडा - कसबा बावडा येथील रेणुका नगरमध्ये राहणाऱ्या शिवम कृष्णात पाटील (वय २३) याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार त्याच्या घरच्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
शिवम पाटील शिकत होता.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवम पाटील हा हॉकीपटू होता. त्याने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. सध्या तो पदवीच्या शेवटच्या वर्षात त्याने घरातील फॅनच्या हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना त्याच्या घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याचा गळफास सोडवून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.