Sangli Crime | पोरं परत का आणलीस?" जुनेखेडमध्ये किरकोळ वादातून पोटच्या मुलाचा निर्घण खून!
ईश्वरपूर : जुनेखेड येथे पारध्यांतील कौटुंबिक वादातून वडील व भावाने कपिल झाझम्या पवार (वय ३५, रा. जुनेखेड) या तरुणाचा कोयत्याने वार करुन निर्घण खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता सरकारी दवाखान्याच्या मागे राहत्या घरी घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
झाडाम्या कस्ताण्या पवार (वय ६०) व भाऊ अजय ऊर्फ अझरुद्दीन झाझम्या पवार (वय २३, दोघे रा. जुनेखेड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कपिल पवार याची मुले ईश्वरपूर येथे आश्रमशाळेत शिक्षण घेत असून उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त घरी आली होती. शाळा सुरू होणार असल्याने सोमवारीमुलांना सोडण्यासाठी तो ईश्वरपूर येथे गेले होते. मात्र शाळेकडून गुरुवारी मुलांना पाठविण्याची सूचना मिळाल्याने तो मुलांना घेवून पुन्हा घरी आला.
सायंकाळी घराबाहेर मुलांच्या कारणावरून कपिल पवार व त्यांचे बडील झाझम्या पवार यांच्यात बाद सुरू झाला. तुझी पोर तु शाळेत न सोडता, परत का घेऊन आलास, ती इथे असली मजी गप रहात नाहीत, तुझ्या पोराने बोरगांव येथून खेळण्याचा लाकडी गाडा उचलून आणला आणला आहे, म्हणतवडील व भावाने भांडणे केली. रात्री आठच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. त्यावेळी झाझाम्या पवारने कपिलच्या कानाजवळ कोयत्याने वार केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट सुरू झाली. याचवेळी अजय ऊर्फ अझरुद्दीन पवार हा हातत विळा घेऊन आला व त्याने कपिल पवार याच्या मानेवर, डोक्यात, हातावर आणि पाठीवर सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कपिल पवार याला उपचारासाठी ईश्वरपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी पत्नी प्रिती कपिल पवार यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करीत आहेत..