Ichalkaranji Crime : इचलकरंजीत धक्कादायक प्रकार; बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दानोळीतील अल्पवयीन मुलीचा इचलकरंजीत जबरदस्तीने विवाह
इचलकरंजी : अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बालविवाहास भाग पाहून त्यानंतर आठ महिन्यांपर्यंत अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात पीडित मुलीचे वडील, आजी यांच्यासह किरण मगदूम, सविता मगदूम आणि अभिषेक मगदूम (तिघे रा. लिंबू चौक, शाहूनगर) यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, २७नोव्हेंबर २०२४ रोजी दानोळी येथील अल्पवयीन पीडितेच्या आणि तिच्या आईच्या मर्जीविरोधात वडील व आजींनी तिला इचलकरंजीतील लिंबू चौक, शाहूनगर येथील किरण मगदूम यांच्या घरी स्थळ पाहण्यासाठी नेली. तेथेच संध्याकाळी जबरदस्तीने अभिषेकशी तिचा बालविवाह लावला. यावेळी किरण व सविता मगदूम हेही उपस्थित होते.
नंतर डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अभिषेकने पीडितेच्या मर्जीविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी पाचही संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रितल परुले तपास करीत आहेत.