For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | आधी मधाच्या बाटलीत मुलीचा फोटो गाडला, आता थेट स्मशानभूमीत भानामती! माणिकवाडीत नक्की कोणाचा सुरू आहे हा खोडसाळपणा?

05:39 PM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   आधी मधाच्या बाटलीत मुलीचा फोटो गाडला  आता थेट स्मशानभूमीत भानामती  माणिकवाडीत नक्की कोणाचा सुरू आहे हा खोडसाळपणा
Advertisement

                    माणिकवाडीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार; गावात भीतीचे वातावरण

Advertisement

ईश्वरपूर : माणिकवाडी येथील स्मशानभूमीत मंगळवारी भानामतीचा प्रकार आढळून आला. कागदावर शेणाने काही मुले व मुलींची नावे लिहून ठेवली आहेत. तर बाजूस हळद-कुंकू व गाडगे पालथे घातले आहे. या खोडसाळपणा मुळे गावात खळबळ उडाली आहे.तीन कागदावर मुले व मुलींची नावे लिहून ते कागद उडू नयेत, म्हणून त्यावर दगड मांडले आहेत.

ही घटनाईश्वरपूर कागदावर मुले-मुलींची नावे लिहून माणिकवाडीतील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार केला आहे.मंगळवारी सायंकाळी राजारामबापू दूधसंघाचे संचालक संजय शिंदे व अन्य लोकांच्या निदर्शनास आला. गेल्या काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीत मधाच्या बाटलीत एका मुलीचा फोटो घालून कोबा फोडून ती बाटली पुरली होती, असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून बाळवा तालुक्यातील कामेरीसह काही गावातील असे प्रकार घडत आहेत. अनेक ठिकाणी अंनिस पदाधिकाऱ्यांनी जावून प्रबोधन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.