For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धक्कादायक : सोलापुरात मनपाच्या कार्यालयात चक्क 'दारू अड्डा'

05:00 PM Dec 07, 2025 IST | NEETA POTDAR
धक्कादायक   सोलापुरात मनपाच्या कार्यालयात चक्क  दारू अड्डा
Advertisement

                        बंद कार्यालयात धक्कादायक दारू पार्टी उघडकीस

Advertisement

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण पथक बाळीवेस येथे कारवाईसाठी गेले असता महापालिकेच्या कार्यालयात चक्क दारू पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे अतिक्रमण पथकासह बाळीवेस येथे कारवाईसाठी गेले असता महापालिकेच्या बंद असलेल्या कार्यालयाच्या जागेत अनधिकृत दारू विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही युवकांना त्यांनी याठिकाणी पकडले. बाळीवेस येथील स्टेट बँकेच्या बाजूला महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचे कार्यालय बंद अवस्थेत होते. याठिकाणी काही युवक पथकाला आढळून आले.

Advertisement

महापालिकेच्या या कार्यालयात मद्यपींसाठी 'चकणा', 'सिगरेट' आदी सुविधाही पुरवल्या जात होत्या. महापालिकेच्या कार्यालयाचे चक्क परमीट रूममध्ये रूपांतर करण्यात आले होते. सध्या सोलापूर शहरातआयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाची मोहीम जोमाने सुरू आहे. याअंतर्गत बाळीवेस परिसरात अतिक्रमण पथक कारवाईसाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अतिक्रमण विभागप्रमुख बनसोडे यांनी तातडीने फौजदार चावडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी आले व संबंधित युवकांना ताब्यात घेतले.या कार्यालयासंदर्भात बनसोडे यांनी संबंधित विभागाकडून अहवाल मागवला आहे. महापालिकेच्या बंद जागांमध्ये कोणी अवैध प्रकार केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा बनसोडे यांनी दिला आहे.

Advertisement

.