For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime News | चार वर्षे मनात राग, अखेर बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाला चार वर्षांनी संपवले

01:07 PM Jun 19, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime news   चार वर्षे मनात राग  अखेर बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाला चार वर्षांनी संपवले
Advertisement

Advertisement

गोकुळ शिरगाव : पंचतारांकितएमआयडीसी परिसरात आढळून आलेल्या बिहारमधील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा गोकुळ शिरगाव पोलिसांनी उलगडा करत तिघांना अटक केली आहे. चार वर्षापूर्वी घडलेल्या प्रेमप्रकरणाच्या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

मृत तरुणाची ओळख रंजनकुमार विरेंद्र भर (वय २६) अशी झालीआहे. पोलिसांनी या प्रकरणी सनी मुना भर, रोहन मुकेश भर आणि अर्जुन मुकेश्वर सिंह यांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पंचतारांकित एमआयडीसीतील बँक ऑफ इंडिया शाखेजवळ एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले;

Advertisement

मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू म्हणून तपास सुरू करण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवालात रंजनकुमार याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध घेतला.तपासादरम्यान, चार वर्षांपूर्वी आरोपी सनी भर याच्या बहिणीलारंजनकुमार याने पळवून नेले होते. त्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी कट रचून रंजनकुमारचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.

खून केल्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात टाकून आरोपी फरार झाले होते.या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत.

Advertisement
Tags :

.