For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडला धक्का, फिरकीपटू जॅक लीच स्पर्धेबाहेर

06:35 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडला धक्का  फिरकीपटू जॅक लीच स्पर्धेबाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली.

उभय संघातील क्पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात जॅक लीचने महत्त्वाची भूमिका बजावत त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी एक विकेट घेतली होती. या सामन्यादरम्यान लीचला क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही आणि आता संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. अशातच आता अबुधाबीत असलेला जॅक लीच आता थेट इंग्लंडला जाणार असल्याची माहिती ईसीबीने दिली आहे. तो इंग्लंडला जाऊन फिटनेस प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, लीचच्या जागी बदली खेळाडूची घोषणा ईसीबीने अद्याप केलेली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.