For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सभापती निवडीत धक्कातंत्र

11:44 AM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सभापती निवडीत धक्कातंत्र
Advertisement

सभापतीपदी संतोष साटविलकर, रुहिता तांबे,अनुराधा नारकर, प्रितेश राऊळ यांची वर्णी

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभापती पदी निवडीत धक्कातंत्र पहायला मिळाले असून अनपेक्षित नावे पुढे आली आहेत. शिंदे सेनेकडून पेंडूर जिल्हा परिषद . सदस्य संतोष साटविलकर, जानवली जिल्हा परिषद सदस्या रुहिता तांबे, भाजपा कडून पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नारकर, रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांची वर्णी लागली आहे. दरम्यान समाज कल्याण सभापती पदी शिंदे सेनेच्या रुहिता तांबे, महिला बाल विकास सभापती पदी भाजपाच्या अनुराधा नारकर यांची निवड निश्चित झाली आहे. तर वित्त ,बांधकाम ,शिक्षण ,आरोग्य ,कृषी आणि पशुसंवर्धन ही खाती कुणाकडे जाणार हे खाते वाटपानंतर स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.