For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शोभिता धुलिपाला करणार हॉलिवूड पदार्पण

06:17 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
शोभिता धुलिपाला करणार हॉलिवूड पदार्पण

देव पटेलसोबत साकारणार मुख्य भूमिका

Advertisement

अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘मंकी मॅन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्लमडॉग मिलेनियर फेम अभिनेता देव पटेलने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून तोच मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून शोभिता धुलिपाला हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची कहाणी भारतावर आधारित असून भगवान हनुमानाच्या कथेवर प्रेरित असल्याचे दिसून येते. ट्रेलरमध्ये देवची व्यक्तिरेखा एका अंडरग्राउंड फाइट क्लबमध्ये दाखविण्यात आली असून जी पैशांसाठी काही प्रसिद्ध फायटर्सकडून मार खात असते. या ट्रेलरमध्ये नायक शत्रूंकडून सूड उगविण्याचे मार्ग शोधत असल्याचे दिसून येते.

माझा पहिला हॉलिवूड चित्रपट मंकी मॅनचा ट्रेलर शेअर करताना मी अत्यंत आनंदी आहे. 5 एप्रिल रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे शोभिताने म्हटले आहे. देवने स्वत:च्या कहाणीचे दिग्दर्शन केले आहे. तसेच पॉल अंगुनावेला आणि जॉन कोलीसोबत स्क्रीनप्ले केला आहे. या चित्रपटात देव आणि शोभितासमवेत मकरंद देशपांडे, सिकंदर खेर, शार्ल्टो कोपले, पितोबाश, विपिन शर्मा, अदिति कालकुंटे आणि अश्विनी काळसेकर हे कलाकारही दिसून येणार आहेत. या हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती देव पटेल, जोमन थॉमस, जॉर्डन पील, विन रोसेनफेल्ड, इयान कपूर, बेसिल इवानिक, एरिका ली, क्रिस्टीन हॅबलर आणि अंजय नागपाल यांनी मिळून केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.