For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वेट्टुवम’मध्ये शोभिता धुलिपाला

06:25 AM Oct 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेट्टुवम’मध्ये शोभिता धुलिपाला
Advertisement

दक्षिणेतील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वेट्टुवम’चा टीझर निर्मात्यांनीं जारी केला आहे. यात चित्रपटाची कहाणी पंकज त्रिपाठी ऐवकत असून सुरुवातही त्यांची झलक दाखवत करण्यात आली आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या गटांदरम्यान स्वत:चा दबदबा काययम ठेवण्याची लढाई दिसणार आहे. या लढायांना जुन्या काळातील भारताच्या पारंपरिक युद्धतंत्रज्ञानांच्या आधारावर तयार करण्यात आले असून याचमुळे सर्व कलाकारांनी वेगवेगळया प्रकारच्या मार्शल आर्ट्समध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

Advertisement

पा. रंजीत यांनी स्वत:च्या ‘वेट्टुवम’ चित्रपटाची घोषणा केली आहे. याच्या हिंदी टीझरला  पंकज त्रिपाठींचा आवाज लाभला आहे. तर तमिळ वर्जनमध्ये पा. रंजती, तेलगूमध्ये राणा दग्गुबाती, कन्नडमध्ये किच्चा सुदीप आणि मल्याळीमध्ये सौबिन शाहिरचा आवाज ऐकू येतो. ते सर्व व्हिडिओत चित्रपटाच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी सांगत त्यावर प्रकाश टाकत आहेत.

चित्रपटात आर्या, व्ही.आर. दिनेश, शोभिता धुलिपाला, कलैयारासन, माइम गोपी, गुरु सोमासुंदरम, शबीर कल्लाराक्कल, जॉन विजय, साई धीना, आनंद सामी, हरीश उथमन, लिजी, लिंगेश प्रेम कुमार, कविता भारती, अर्जुन, संथा कुमार, मेलोडी, मनीषा, निम्मी, राफाइल, विक्रम, नवीन आणि प्रकाश हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन पा. रंजीत यांनी केले असून त्यांनीच याची कहाणी लिहिली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगु, हिंदी, मल्याळी, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.