For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीकाटीलो चित्रपटात शोभिता धुलिपाला

07:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
चीकाटीलो चित्रपटात शोभिता धुलिपाला
Advertisement

रोमांचाने युक्त क्राइम थ्रिलर,रहस्यमय मृत्युमळे वाढणार सस्पेंस

Advertisement

अभिनेत्री शोभिता धुलिपाला यापूर्वी 2024 मध्ये  ‘लव्ह, सितारा’ चित्रपटात दिसून आली होती. आता शोभिताच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून यावेळी ती एका मृत्यूचे कोडं उकलताना दिसून येणार आहे. शोभिताच्या या  चित्रपटाचे नाव ‘चीकाटीलो’ असून तिचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे. शोभिता ही ‘चीकाटीलो’ चित्रपटात ‘ट्रू पॉडकास्टर’च्या भूमिकेत दिसून येणार आहे. या पोस्टरमध्ये शोभिता, मागील बोर्डावर लावलेले घुंगरू आणि त्याच्याशी संबंधित रहस्यमय मृत्यू दिसून येत आहे. पोस्टर शेअर करत तिने ‘रात्र होण्यापूर्वी संध्या येते, प्रभावासाठी तयार रहा’ अशी कॅप्शन नमूद करण्यात आली आहे.

शरण कोपिशेट्टीच्या दिग्दर्शनातील ‘चीकाटीलो’ चित्रपटाची कहाणी संध्याच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. सध्या ही एक ट्रू-क्राइम पॉडकास्टर असून ती सत्याच्या शोधात असून शहरातील सर्वात धक्कादायक रहस्यांची ती उकल करते. स्वत:च्या इंटर्नच्या रहस्यमय मृत्यूनंतर न्याय मिळविण्याच्या स्वत:च्या प्रयत्नात तिला भयावह गुन्ह्यांच्या साखळीचा शोध लागतो. यानंतर रहस्य, सस्पेंस आणि रोमांचाचे सत्र सुरू होते. ‘चीकाटीलो’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 23 जानेवारीपासून स्ट्रीम होणार आहे. चित्रपटात शोभिता आणि विश्वदेव राचकोंडा, चैतन्य विशालक्ष्मी, ईशा चावला, झांसी, आमानी आणि वडलामणि श्रीनिवास हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.