शोभनादेवी पाटील यांचे निधन
सावंतवाडी | प्रतिनिधी
कोल्हापूर नागाळा पार्क येथील रहिवासी श्रीम. शोभनादेवी हरिभाऊ पाटील( वय 78 ) यांचे निधन झाले. त्यांचे बालपण व शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथे झाले. राणी पार्वती देवी हायस्कूल मध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कला शाखेतून श्री पंचम खेमराज महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी अनेक पदके मिळवली होती. हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली ,भाऊ ,वहिनी, जावई ,सुना ,नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे. कर्नल शिवराज पाटील व अमेरिकेत स्थायिक असलेल्या डॉक्टर माधवी अमिताभ पाटील ,ज्योती विनय सावंत यांच्या त्या मातोश्री होत. तर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,कर्नल सुभाष भोसले, धैर्यसिंग भोसले , रवींद्र भोसले यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्यावर कोल्हापूर नागाळा पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.