महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शोभा करंदलाजे यांच्याकडे ‘अन्नप्रक्रिया’चा अतिरिक्त भार

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींकडून मंजूर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

पाच राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी आपले राजीनामे सादर करत राज्यांमध्ये सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. या राजीनामासत्रानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि रेणुकासिंह सऊता यांनी राजीनामे दिले. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. तसेच राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. याव्यतिरिक्त राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी गुरुवारी रात्री उशिराने दिली.

लोकसभा अध्यक्षांनीही स्विकारले राजीनामे

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल यांच्यासह नऊ लोकसभा खासदारांचे राजीनामे स्वीकारले असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुऊवारी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपच्या खासदारांनी राजीनामा दिला होता. दोन केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त मध्यप्रदेशातील राकेश सिंह, उदय प्रताप सिंह आणि रिती पाठक यांनी राजीनामे दिले होते. तसेच राजस्थानमधील दिया कुमारी व राज्यवर्धनसिंह राठोड या दोघांनी आणि छत्तीसगडमधील गोमती साई आणि अऊण साओ हे राजीनामे देणारे लोकसभा खासदार आहेत. राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा यांनीही राजीनामा दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article