सकल हिंदू समाजाच्या उद्याच्या (23) कोल्हापुर बंदला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा
बांगलादेशातील हेंदूवर होत असलेले अन्याय,महंत रामगिरी समर्थनार्थ आणि कोल्हापुरातील हिंदू विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि 23) कोल्हापुर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.या बंदला शिंदे शिवसेना पाठिंबा जाहीर करत आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=cvp_SX7xOYY[/embedyt]
20 ऑगस्ट रोजी समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध करण्यात आल्या.या मोर्चात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उद्देsशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला.कोल्हापूरात अशा पध्दतीने आंदोलनात भडक वक्तव्ये करणाऱ्या विरोधात पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी या मागणीसाठी सकल हेंदू समाजाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शिवसेना जाहीर पाठिंबा देत असल्याचे राजेश क्षीरसागर म्हणाले.
मोर्चात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उद्देशून शिवीगाळ करणाऱ्या कांबळे याच्यावर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, चिथावणीखोर वक्तव्ये करणे, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे उपस्थित होते.
वसंतराव मुळीक यांनी मराठा समाजाला काँग्रेसच्या दावणीला बांधले.
मराठा समाज कोणत्याही पक्षाला बांधील नसताना मराठा समाजाचे पद मिरवून वसंतराव मुळीक यांनी पुरोगामित्व स्वीकारले आहे. मात्र व्यक्तिगत स्वार्थापोटी मराठा समाजाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे.मंगळवारच्या मोर्चात हिंदू समाजाला आतंकवादी संबोधले गेल्यावर गप्प का बसले, याची भूमिका मराठा समाजासमोर जाहीर करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत राजेश क्षीरसागर यांनी केली.माजी महापौर आर.के.पोवार यांनाही लक्ष्य केले.